हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. परंतु संजय राठोड यांच्या सारख्या धडाडीच्या नेत्याची गरज असून ते लवकरच मंत्रिमंडळात दाखल होतील अस मोठं विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं.
संजय राठोड हे बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असंही उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. मात्र कोकणातील राजकारणावर त्याचा काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. शिवसेना कोकणात भक्कम आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांन केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात देण्यात येईल अशी अपेक्षा होती. पण भाजपकडून पंकजा मुंडे आणि जुन्या नेत्यांना डावलले जात आहे, हे सिद्ध झाले, असेही ते म्हणाले.