शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavhan Suicide Case)अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहोरादेवी येथे शक्तिप्रदर्शन केल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, संजय राठोड यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. याशिवाय ‘लोकांनी कोरोनाबाबत जागृत राहायला हवे, अजूनही लोकं गंभीरपणे वागत नाही’ असं म्हणत संजय राठोड यांनी पोहोरादेवी इथं झालेल्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली.

संजय राठोड हे यवतमाळमधून मुंबईला रवाना झाले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पोहोरादेवी इथं झालेल्या शक्तिप्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल संजय राठोड यांना विचारले असता, ‘मी त्यावर काही बोलणार नाही’ अशी प्रतिक्रिया दिली. तसंच ‘मी मंगळवारीच कामावर रुजू झालो आहे. सर्व काही सुरळीत कामकाज सुरू केले आहे. आज कॅबिनेट आहे, त्यासाठी निघालो आहे’ असं यावेळी संजय राठोड म्हणाले.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण एकूणच ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्याबाबत शरद पवार समाधानी नाहीत. संजय राठोड प्रकरणी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. ते ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समजतं. तसंच या प्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, असंही शरद पवारांचं मत असल्याचं समजतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment