‘भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती’ – खासदार संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । ‘भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं.’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत राऊत यांनी बोलताना सांगितलं.

ते पुढे म्हणाले, राज्यामध्ये सध्या असलेले महाविकास आघाडी सरकार हे पूर्ण विचार करुनच सत्तेत आले आहे याची तयारी आम्ही आधीपासून केली होती असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. “आत्ता आलेलं सरकार हे टेस्ट ट्युब बेबी नाही. हे व्यवस्थित जन्माला घातलेलं सरकार आहे. याबद्दल आम्ही बऱ्याच आधीपासून प्लॅनिंग केलं होतं,” असं राऊत यांनी सांगितलं.

”माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचे आहे असं भाजपचे राजकारण सुरु आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष हे काय पाकिस्तानी पक्ष आहेत का?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत राऊत यांनी भाजपवर टीका केली. या सरकारमध्ये ‘मंत्रीमंडळामधील खाणारी खाती आमच्याकडे ठेवली नाहीत,’ असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.