फडणवीस हे नॅनो बुद्धीचे तर एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मंत्री; संजय राऊतांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

“महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर एकनाथ शिंदे यांना सत्तेवर आणले आहे. एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मंत्री आहेत. त्याचे साताऱ्यात 2 हेलिपॅड आहेत. कालच्या मोर्च्याची ते रत्नागिरीच्या सभेशी तुलना करत असेल तर हे लोक आमच्या पक्षात होते हे दुर्देव आहे. फडणवीस कालच्या मोर्च्याला नॅनो मोर्चा म्हणतात. हा मोर्चा नॅनो होता की आणखी काही होता हे देशाने पाहिलं. हा ज्ञानदेवाचा महाराष्ट्र आहे. नॅनो बुद्धीचा नाही. फडणवीसांनी स्वत:ची अवहेलना करून घेऊ नका. खरं तर शिंदे भाजपच सरकार हेच नॅनो सरकार आहे,” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

संजय राऊत यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अटींवर सत्तेवर आणले आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर त्यांना सत्तेवर आणलं आहे. जनतेत उद्रेक झाला तरी तुम्ही बोलायचं नाही या अटीवर त्यांना सत्ता देण्यात आली असून कालच्या मोर्च्याची ते रत्नागिरीच्या सभेशी तुलना करत असेल तर हे लोक आमच्या पक्षात होते हे दुर्देव आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जातात. तिथे त्यांना एक इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे त्यांची गुंगी उतर नाही. हे सर्व गुंगाराम गुंगीत आहेत. गुंगी उतरल्यावर पुन्हा ते दिल्लीत जातात आणि इंजेक्शन घेतात. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राची अवहेलना केली. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून पाचोळ्यासारखे उडून गेले. खरं तर कालच्या मोर्चाचे स्वागत फडणवीसांनी करायला हवे होते पण तसे झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान केला गेला आहे. त्याविरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/895158481850433

मोर्चाला नॅनो संबोधून एक प्रकारे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न

यावेळी राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मोर्चाला नॅनो संबोधून तुम्ही एक प्रकारे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य नाही. केंद्राने राज्यपालांना माघारी बोलावलं नसलं तरी जनतेने राज्यपालांना डिसमिस केलं आहे. आता सरकारलाही डिसमिस केलं जाईल, असा इशाराही दिला.