हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे हे अपयशी ठरले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु आहेत असा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत केलेला वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. महविकास आघाडी मजबूत आहे असेही त्यांनी म्हंटल. संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपला आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा वापर केला. ते काम पूर्ण झालं. पण महाराष्ट्रात जे राजकीय साध्य करायचं होतं ते भाजपला करता आलं नाही. भाजपला ताकद देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. हे भाजपच्या लक्षात आलं आहे. मिंधे आल्यापासून भाजपही रसातळाला जात आहे, त्यामुळेच दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
महाविकास आघाडी तुटणार? पवारांच्या 'त्या' विधानाने चर्चांना उधाण
शरद पवार नेमकं काय म्हणाले पहाच https://t.co/eRwGqWORIk#Hellomaharashtra #SharadPawar #MahaVikasAghadi
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 24, 2023
दरम्यान, २०२४ मध्ये महविकास आघाडी एकत्र लढणार कि नाही हे आत्ताच कस सांगू असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम निर्माण केला, याबाबत संजय राऊत याना विचारलं असता शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. शरद पवारांचा माविआच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्त्व यात आहे आणि ते राहणार. त्यांची इच्छा आहे की आपण तिघं एकत्र राहिलो, तर २०२४ साली आपण भाजपाचा पराभव करू, त्यामुळे मविआसंदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल असं मला वाटत नाही असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.