हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र शरद पवार यांनीच हा प्रस्ताव नाकारून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. त्यानंतर काँग्रेसनही उमेदवार देण्यास नकार दिला. याचंबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. शरद पवार हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती अस त्यांनी म्हंटल. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवारांनी ही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती. शरद पवार जर या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर त्यांना अनेक राज्यातून मतदान झालं असत. येवडच नव्हे तर कदाचित शरद पवारांच्या बाजूने पारडे झुकले असते. पण पवार साहेबांनी नकार दिल्यामुळे या निवडणुकीतील उर्जाचं निघून गेली अस राऊत म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी एनडीए आणि विरोधकांमधून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.