हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पेगासस प्रकरणावरून सध्या मोदी सरकारवर चोहोबाजूनी टीका होऊ लागली आहे. तर शिवसेना, काँग्रेसकडून भाजपवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ” पेगासस प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहून केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. जर या सरकारकडे तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
केंद्रातील मोदी सरकारविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी खासदार राऊतम्हणाले की, ज्यापासून हे सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून या सरकारचा संसदीय लोकशाहीवर अजिबात विश्वास नसल्याचे दिसते. या सरकारची सरकत मोठी जबाबदारी कोणती असेल तर ती संसद चालविण्याची होय. मात्र, सध्याच्या स्थितीवरून या सरकारची संसद चालविण्याची इच्छा दिसत नाही. पेगासस प्रकरणात केल्या जाणाऱ्या चर्चेबाबत आमच्याशी विरोधी पक्षांची केवळ साधीच मागणी आहे कि केवळ तीन तास पंतप्रधान व गृहमंत्री यांनी आम्हाला द्यावेत.
आमच्याकडून केल्या जात असलेल्या चर्चेच्या मागणीकडे मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. जर चर्चाच करायची नसेल तर मग अनेक मार्ग आहेत. चर्चेनंतर या प्रकरणी मग न्यायालयीन चौकशी नेमायची का? असाही निर्णय घेणे महत्वाचे आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.




