राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या जागेसाठी भाजपातर्फे मंत्री पीयूष गोयल, भाजप नेते अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला. त्यावर आता राऊतांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “लोकशाही आहे ज्याला आपण संसदीय लोकशाही म्हणतो ती आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर कोणाला निवडणुका लढायच्या असतील तर लढू शकतात, फक्त एक लक्षात घेतले पाहिजे घोडेबाजार करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, तो करण्याचा प्रयत्न केल्यास आमच्या गृह खात्याचे आणि मुख्यमंत्र्यांचेही लक्ष आहे, असे राऊतांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावल्यानंतर राऊतांनीही माध्यमांशी संवाद साधत भाजपला इशारा दिला. यावेळी राऊत म्हणाले की, आमच्या प्रत्येक हालचालीवर ज्या प्रमाणे केंद्र सरकारचे लक्ष असते. त्या प्रमाणे या निवडणुकीवरही राज्य सरकार प्रामुख्याने गृह विभागाचे लक्ष आहे. आणि मुख्यमंत्रीही निवडणुकीतील घोडेबाजारावर लक्ष ठेऊन आहरेत. या निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्नही करू नये. आणि हि निवडणूक झाली तर सर्वांचे स्वागतच आहे. मात्र, नाही झाली तर त्यांचे डबल स्वागत आहे,” असे राऊत यांनी म्हंटले

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सन्जय राऊत यांनी आरोप केल्यानंतर त्यांच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक असे विधान केले होते. फडणवीस म्हणाले होते की,“आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला पाहिजे तर घोडेबाजार होणार नाही. जरी त्यांनी उमेदवार कायम ठेवला आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. सदसदविवेक बुध्दीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. जे लोक दिल्लीत बसलेले आहेत, ते महाराष्ट्रासोबत नेहमीच बदल्याच्या भावनेने काम करतात, असे फडणवीस यांनी म्हंटले होते.