हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची तलवारीने मुंडकी छाटावी वाटतात, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी आज दिला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपतींबद्दल कोणीही बोलल्यास राग येणारच. उदयनराजेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. उदयनराजे हे सातारच्या गाडीचे राजे आहेत. त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. ज्या पक्षाने आपल्या शिवरायांचा घोर अपमान केला आहे. आणि परत त्या अपमानाचे समर्थन केले जात असेल तर अशा वेळेला त्या पक्षात राहणे हे योग्य नाही, असे राऊत यांनी म्हंटले.
संजय राऊत यांच्याकडून नाशिक जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपमधिक जर शिवप्रेमी कोणी असतील खरे तर खरोखर जर छत्रपतींविषयी प्रेम, आस्था, श्रद्धा असेल छत्रपतींविषयी प्रेरणा असेल तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांकडून माफीनामा लिहून घ्यावा. आणि त्यांना त्याच्या घरी परत पाठवावे.
मुंडकी छाटण्याची अशी अनेक वक्तव्य भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आणि त्या तीव्र भावनांचा स्फोट उदयनराजे भोसले यांच्या वाणीतून होत असेल तर त्याकडे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पाहिले पाहिजे, असे राऊत यांनी म्हंटले.
उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपप्रवक्ते त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आज खा. उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. “असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी. निवडणूका महत्वाच्या कि महापुरुषांची बदनामी हे सरकारने सांगावे? असा सवाल उदयनराजेंनी केला आहे.
हतबल शिंदे-फडणवीस सरकाला लाज वाटायला पाहिजे : राऊत
संजय राऊत यांनी यावेळी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. हतबल आणि लाचार अशा राज्य सरकारला लाज वाटायला पाहिजे. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना पाय ठेऊ देत नाहीत. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आता ढोंग करु नये, कर्नाटकमध्ये जाऊन दाखवावे. तीन महिन्यापासून कर्नाटक सरकारमध्ये हिंमत आली कशी. बेळगाववासीयांची गाऱ्हांनी ऐकायला जाऊ, असं ते म्हणतात. राज्यातील क्रांतिकारी सरकार काय करतं. जनतेनं यांची क्रांती स्वीकारली का? बेळगावात तुम्हाला पाय ठेवू दिलं जात नाही. अत्यंत हतबल, लाचार सरकार राज्यात आहे. हे काहीही करू शकणार नाही. महाराष्ट्रानं दोन समन्वयक मंत्री नेमले आहेत. पाकिस्तानला जायला बंदी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जायला काय. हा माणूसकीचा लढा आहे. अन्याय, अत्याचाराविरोधातील लढा आहे, असे राऊत याणी म्हंटले.