हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. राऊतांना तब्बल १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे.
संजय राऊत यांच्यासोबत प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप करत 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात होते.
#UPDATE | Patra Chawl land scam case: Mumbai's PMLA court grants bail to Shiv Sena leader & MP Sanjay Raut https://t.co/upyL10h3pR
— ANI (@ANI) November 9, 2022
संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला होता .