हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच शिवसेना पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची मुलाखत घेण्यात आली आहे.या मुलाखतीचा टीचर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये खासदार संजय राऊत बेधडक भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी, “ED ही एक दहशतवादी संघटना असून बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आली नाही तर शिवसेना महाराष्ट्रासाठी, लोकांसाठी संघर्ष करण्यासाठी जन्माला आलीये” अशी गंभीर टीका भाजपावर केली आहे.
“शंभर भ्रष्टाचारी गोळा करायचे अन् त्यांना पक्षात आणायचे हे कुठलं बहुमत? याला बहुमत नाही तर व्यापार म्हणतात. ईडी ही दहशतवादी संघटना असून बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात. मराठी माणूस ज्याला तुम्ही घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता त्या माणसाला प्रतिष्ठा म्हणून शिवसेना स्थापन झाली. मित्रपक्षाने फसवले म्हणून शिवसेना थांबली का? संपली का?, हे जे कोणी बोलातयेत ते माझ्या भाषेत चु.. आहेत” अशा शब्दात त्यांनी भाजपावर घणाघाती प्रहार केला आहे.
इतकेच नव्हे तर, “शिवसेना अग्निकुंड आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची संघटना नक्कीच दोन पाऊले पुढे नेली. भाजपानं ज्यापद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली त्यांना क्षमा नाही. महापालिका निवडणुका नाहीत. लोकसभा घेतील का नाही माहिती नाही. हे लोक जनतेला घाबरतात आणि जे जनतेला घाबरतात तो नेता नाही” अशी टीका देखील राऊत यांनी या मुलाखतीत भाजपवर केली आहे.
दरम्यान, शिवसेना पॉडकास्टमध्ये संजय राऊत यांची ही मुलाखत शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी घेतली आहे. १० ते ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मुलाखतीत संजय राऊत भाजप वर टीका करताना तसेच आपली परखड भूमिका मांडताना दिसत आहेत. मुलाखतीत बोलताना त्यांनी, “शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. लोकांच्या संघर्षासाठी जन्माला आली. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल” असे वक्तव्य केले आहे.