हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत आणि हे काही संघ संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, माजी मुख्यमंत्री होते. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो, असे फडणवीसच म्हणत असतील तर मग अशा नेत्याला अटकेची भीती का वाटते? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भलेही विरोधक असू आम्ही पण आम्ही राजकीय सहकारी आहोत. तुम्हाला असे वाटत नाही का कि अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतींने अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या पक्षातील चोर आणि लफंगे यांना यांना क्लीनचिट दिली जात आहे. आमचे फोन चोरून ऐकणारे त्याच्यावर गुन्हे दाखल होते. त्यांनाही तुम्ही क्लीनचिट दिली. आणि हि तुमची काम करण्याची पद्धत आहे का? आणि स्वताच्या संदर्भात चौकशीच पत्र आलं किबोभाटा करायचा मला अटक करणार, मला अटक करणार कोणीही यांना अटक करणार नव्हते. अडीच वर्षात अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य महाविकास आघाडी सरकारमध्ये कधी झालं नाही आणि उद्धव ठाकरे यांनी केलेही नसते.
उध्या अमित शहा, नरेंद्र मोदी सत्तेवरून उतरल्यानंतर त्यांच्याकडेही जबाब घ्यायला जातील. मग फडणवीस कशाला घाबरताहेत. तुमच्यापर्यंत लोकांनी पोहचायचेच नाही का? जर कायद्यांचे राज्य असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. आम्ही गेलो ना हिमतीने. आम्ही रडत बसलो का? आम्ही काळ लढलो, आज लढत आहोत आणि उध्याही लढत राहू, आणि या लढयातून पुन्हा आमचं सरकार महाराष्ट्रात येईल हे तुम्ही लिहून घ्या, असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
अमित शहांना छत्रपतींचा आशीर्वाद लाभणार नाही; कारण…
अमित शहा महाराष्ट्रात कुठेही गेले तरी त्यांना छत्रपतींचा आशीर्वाद लाभणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तुम्ही अभय दिल. त्यांचे समर्थन केले. इतकेच नाही तर ते जाता जाता त्यांच्या अभिनंदनाचा ठराव जे सरकार मंजूर करत. त्यांना अचत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना मानणारा मराठी वर्ग पाठींबा देईल असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. शिवनेरीवरती अमित शहा यांनी जरूर जावं पण छत्रपती जन्मलेल्या मातीतून तुम्हाला काही पवित्र गोष्टी घेऊन जात आल्या तर घेऊन जा. बेशिस्त, बेईमानी आणि गद्दारी यांचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. तेवढजरी तुम्ही शिकून गेला तरी तुम्हाला बर्याच गोष्टी कळतील, असा टोला राऊतांनी लगावला.