दिया तो कब्र पर भी जल रहा है…!!; संजय राऊतांचा ट्वीटद्वारे निशाणा

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यात म्हंटले आहे की, “उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है !!” राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा व शिंदे समर्थक आमदारांचा, बहुमताचे पत्र राज्यपालांना देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच Wait and watch…’ असे म्हंटले आहे. त्याबद्दल आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी उठाव करत शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर भाजपसोबत जात युती केली आहे. यावरून राऊत यांनी भाजप व शिंदे गटावर टीका केली आहे.