…म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले एकत्र ; संजय राऊतांनी सांगितले कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेत काँग्रेस व शिवसेनेने आपापले आमदार मुंबईत बोलवून हॉटेलमध्ये ठेवले आहेत. यावरून आता भाजप नेत्यांकडून टीका केली जाऊ लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदार हॉटेलमध्ये ठेवण्यामागचे कारण सांगितले आहे. “आमदारांना निवडणुकीत मतदानाबाबत सुचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र बोलावले आहे. तसेच तुम्ही केलं तर गेट टुगेदर आणि आम्ही केले तर आम्ही आमदारांना बाजुला नेले, असे राऊत याणी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत थेट भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत सर्वच पक्षाचे आमदार मतदानाला एकत्र जात असतात. आमदारांना मतदानासंदर्भात सुचना द्यायच्या असतात. राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही तांत्रिक असते. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी करण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवले जाते.

राज्यसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.
राज्यसभा निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. शिवसेनेमी सर्व आमदारांना मुंबईत मढ येथील हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवले आहे. काल रात्रीपासून शिवसेनेचे सर्व आमदार हॉटेल रिट्रीटमध्ये आहेत. आज त्यांना नरिमन पॉईंट्स ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहेत. आज महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. बैठकीनंतर महाविकास आघाडीचे आमदारही तिथेच मुक्काम करणार आहेत. 10 जूनला मतदान होईपर्यंत ट्रायडंटमध्येच सत्ताधारी तीनही पक्षाचे आमदार ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबणार आहेत.

Leave a Comment