शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंची दिल की बात! राजकारण ढवळून निघणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलीकडे घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. त्यानंतर आता सामनाने आपला मोर्चा खुद्द मुख्यमंत्र्यांकडे ओळवला असून उध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत संजय राऊत यांनी सामना साठी घेतली आहे. यावेळी ठाकरे यांनी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आहे. कोरोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सदर मुलाखत 25, 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी त्याचबरोबर अनेक मुद्यांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या, गलवान व्हॅलीतील संघर्ष, लॉकडाउन आदी विषयावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तर राज्यातही करोनाबरोबरच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आदी मुद्यांभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. संजय राऊत यांच्या शरद पवारांसोबतच्या मुलाखतीने राज्यात अनेल राजकीय चर्चा रंगल्या होत्या. आता उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत कोणते गौप्यस्फोट होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.