हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन सध्या केंद्रातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राष्ट्रपतिपदासाठीचा उमेदवार सर्वानुमते ठरवण्यासाठी एकत्रित चर्चा केली जात असून या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “राष्ट्रीय प्रश्नावर शिवसेनेने कधीच खालच्या पातळीचे राजकारण केले नाही. राष्ट्रीय प्रश्नावर शिवसेनेने सदैवर दरवाजे उघडे ठेवले आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याबाबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेची भाजपसाठी दारे सदैव खुली आहेत,असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज अयोध्येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या ज्यावेळी राष्ट्रीय विचार, मुद्दे उपस्थित होतात त्यावेळी शिवसेना नेहमीच सहकार्य करते. शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे हे कधीच दरवाजे बंद करून बसले नाहीत. राष्ट्रीय भूमिकांवर त्यांनी नेहमी दरवाजे उघडे ठेवले आहेत. तुमचा प्रश्न राजकीय आहे. पण राष्ट्रीय प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे कधीही खालचया पातळीचं राजकारण करत नाहीत.
राष्ट्रपती पदासाठी उमेदवार असणे आवश्यक आहे. आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व आणि दिशा मिळावी अशीच आहे. त्यामुळे शिवसेनेकडू उमेदवार निवडीसाठी कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. मात्र, आमच्या हिंदुत्वावर विरोधकांना प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. विरोधकांनी देशाला मान्य होईल असा उमेदवार राष्ट्रपती पदासाठी द्यावा, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.