विरोधी पक्षात काम करताना आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वय हवा; संजय राऊतांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीच्यावेळी जो गोंधळ झाला तो झालेलाच आहे. हे कुणी नाकारु शकत नाही. त्याकडे महाविकास आघाडी म्हणून आघाडीतील सर्व नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार होते तेव्हा एका किमान समान कार्यक्रमावर तीन भिन्न पक्ष एकत्र होते. ज्या पद्धतीने आम्ही सरकार चालवले. तोच समन्वय आणि तोच एकोपा विरोधी पक्षात असताना असायला हवा. तरच आपण पुढे जाऊ शकतो, असे मोठे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पाच जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीने एकत्रीत बसून भूमिका ठरवणे, चर्चा व्हायला पाहीजे होती, मात्र ते झाले नाही. भविष्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समन्वय ठेवला तर भविष्यात अशा अडचणी येणार नाही. याचेच उदाहरण सांगायचे झाले तर आमची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माहिती दिली. कोणताही निर्णय घेत असताना समन्वय असला पाहिजे.

खरी चूक हि सत्यजित तांबे यांचीच : राऊत

यावेळी संजय राऊत यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत विधान केले. ते म्हणाले की, तांबे कुटुंब हे निष्ठावान आहेत. पूर्वापार ते काँग्रेसशीच संबंधित आहेत. मात्र नंतर सत्यजित तांबेंनी काय निर्णय घेतला हे जर आम्हाला माहित नसेल काँग्रेसला माहित नसेल तर काय करता येईल? तांबे कुटुंब आणि गांधी घराण्याचे संबंध चांगले आहेत. सत्यजित तांबे यांनी जी चूक केली आहे ती त्यांची चूक आहे. त्याकडे काँग्रेसची चूक म्हणून पाहता येणार नाही. जे काही नाशिकमध्ये घडलं आहे ते घडायला नको होतं. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. काहीही झाले तरी नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही, असेही राऊत यांनी म्हंटले.