भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या पाठींब्याबाबत राऊतांनी केलं ‘हे’ मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे, असे सांगितले. “मातोश्रीवर नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये पाठिंब्याबाबत हा निर्णय घेण्यात आला. खासदारांची मत समजून घेत उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, पाठींब्याबाबत खोटी माहिती बाहेर पसरवली जात आहे,” असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यावेळी म्हणाले की, “बाळासाहेब शिवसेनाप्रमुख होत असतानाही अशा विषयांवर नेत्यांची बैठक ही घेतली जात असे. सहकाऱ्यांची मते जाणून घेऊन निर्णय घेतले जायचे. आत्ताच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीबाबत कालच्या बैठकीत चर्चा केली. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपाला पाठिंबा होत नाही. यशवंत सिन्हा यांच्यासोबतही आमच्या सद्भावना आहेत. अशावेळी लोकभावना पाहून निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वीही प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला होता. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता.”

मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा असे नाही

“द्रोपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिली आहेत. त्यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणार अधिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. बैठकी दरम्यान प्रत्येकाची मतं समजून घेतली. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे नाही,” असेही यावेळी राऊत यांनी म्हंटले.

Leave a Comment