हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या स्थगितीबाबत राजकीय लोकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या दौऱ्याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. ताज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत आम्हाला मदत मागितली असती तर आम्ही त्यांना नक्कीच मदत, सहकार्य केलेअसते, असे राऊत यांनी म्हंटले.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले म्हणाले की, आम्ही धार्मिक लोक आहोत. हिंदुत्ववादी आहोत. आम्हीही त्या ठिकाणी जाणार आहोत. श्रीरामाच्या दर्शनासाठी कोणीही जाऊ शकते. प्रत्येकाला अधिकार आहे. काही दिवसापासून अयोध्येतील वातावरण बदलले असल्याचे मी पाहिले. मात्र आता राज याचा दौरा स्थगित झाला आहे.
शिवसेना आणि अयोध्येचे एक वेगळं नातं आहे. महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आता मंत्री आदित्य ठाकरे हे 15 रोजी हे अयोध्येला जाणार आहेत. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे अयोध्येत शक्ती प्रदर्शन करणार नाही, असे राऊत यांनी म्हण्टले.
काही राजकीय नेत्याचा भाजपकडून वापर
यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे व भाजपवर निशाणा साधला. सध्या भाजपकडून एक वेगळ्या प्रकारचे राजकारण केले जात आहे. काही राजकीय नेत्यांना हाताशी धरायचे त्यांच्या आपल्या फायद्यासाठी वापर करायचा, असे भाजपकडून केले जात आहे. मात्र आता अनेत्यांना शहाणपण येणे गरजेचे आहार, असा टोला राऊत यांनी लगावला.
संभाजीराजेंनी शिवसेनेचाच उमेदवार म्हणून निवडून यावा
यावेळी राऊत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत यावे आणि शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, असे इच्छा आहे. शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवेल. संभाजीराजे भोसले शिवसेनेचे उमेदवार होणार असतील, तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा”, असेही संजय राऊत यांनी म्हंटले