Friday, June 2, 2023

राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेने घातली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार असून अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे म्हंटले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल वर्षा बंगल्यावर भेट घेतली. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटे चर्चा झाली. यावेळी शिवसेनेत प्रवेश करावा त्यानंतर आपल्याला उमेदवाराची दिली जाईल, अशी अट संभाजीराजे यांना घालण्यात आलेली आहे.

नुकतीच संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची भेट घेतली. यावेळी दोघांच्यात काही मुद्यांवर चर्चाही झाली. या भेटीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिली आहे.

संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करुन कळवतो, असेही सांगितले. कालच्या भेटीवेळी संभाजीराजेंना शिवसेनेकडून पक्षप्रवेशाची अट घालण्यात आलेली आहार. त्यामुळे आता शिवसेनेच्या या ऑफरला संभाजीराजे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

संभाजीराजेंनी शिवसेनेचाच उमेदवार म्हणून निवडून यावे…

दरम्यान सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत यावे आणि शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, असे इच्छा आहे. शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवेल. संभाजीराजे भोसले शिवसेनेचे उमेदवार होणार असतील, तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा”, असेही संजय राऊत यांनी म्हंटले.