काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी?? संजय राऊत म्हणतात, आम्ही कधीच….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा देशात तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला वेग आला. मात्र या भेटीत चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस नेत्याना भेटणे टाळले. त्यामुळे आगामी निवडणूकीत काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी होणार का याबाबत विचारले असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र काँग्रेस सोबतीला असेल अस म्हंटल.

संजय राऊत म्हणाले, आम्ही कधीच काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचा उल्लेख केलेला नाही. ज्यावेळी ममता बॅनर्जींनी अशा राजकीय आघाडीबद्दल विषय काढला तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची मागणी केली. केसीआर यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

ते पुढे म्हणाले, देशात तिसरी आघाडी, चौथी, पाचवी आघाडी कधीही यशस्वी झाली नाही. निवडणूका आल्या की आघाड्यांचे आकडे येतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साडेचार तास चर्चा झाली. विकास, अर्थिक विषय आणि देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमती झाली. भविष्यातील राजकीय दिशा बाबत चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Comment