“जे सूडाचं राजकारण सरकारला करायचं, ते त्यांनी करावे”; राणेंच्या बंगला कारवाईप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज नाशिक जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. तत्पूर्वी औरंगाबाद येथे फडणवीस यांनी भाजप नेते नारायण राणे यांना मुंबई महापालिकांकडून बजावलेल्या नोटिसीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “मंत्री राणे यांच्या बंगल्याप्रकरणी तसेच रवी राणा करून जे सुडाचे राजकारण सरकारला करायचे आहे ते त्यांनी करावे. न्यायालय याबाबत कारवाई करेल,” असे फडणवीस यांनी म्हंटले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सध्या सरकारकडून रवी राणा, नारायण राणे यांच्याबाबत काय चाललंय ते दिसत आहे. गावागावात शहरात सरकार कशा प्रकारे सुडाचे राजकारण करत आहे ते लोक पाहत आहेत,. न्यायलय यावर आपला निर्णय देत कारवाई करेल.”

यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्यातील बैठकीबाबत सूचक असे विधान केले. ते म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना भेटून आले म्हणून त्यातून फार काही होईल, असं मला वाटत नाही. या सगळ्या मंडळींनी मागच्या लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली पण काहीच फायदा झाली नाही. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात हा प्रयोग केला, पण कुठेच फायदा झाला नाही. तेलंगणात भाजपच नंबर एकचा पक्ष असेल, असे फडणवीस यांनी म्हंटले.