पुनः पुन्हा दळण का दळायचे? ‘आणीबाणी’च्या विधानावरून राऊतांनी राहुल गांधींना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी यांनी आणीबाणीसंदर्भात केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?” अशा शब्दात  संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या सदराच्या माध्यमातून राहुल गांधी यांना फटकारले.

राहुल गांधी हे सरळ आणि मोकळ्या मनाचे आहेत. आणीबाणीवर ते सहज बोलून गेले आणि त्यावर दळण सुरू झाले, चर्चा सुरू झाली. १९७५ साली इंदिरा गांधी यांनी एका विशिष्ट परिस्थितीत देशावर आणीबाणी लादली. त्यास एक कालखंड उलटून गेला. ज्यांचा आणीबाणीशी कधीच संबंध आला नाही अशी पिढी राजकारणात, पत्रकारितेत आहे. असे सामनातून म्हंटल.

राहुल गांधी यांनी आणीबाणीविषयी माफी मागण्याचे कारण नव्हेत असं म्हटलंय. “इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला व फक्त तीन वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. म्हणजे जनतेने त्यांना माफच केले. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे!” असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी राऊतांनी केंद्रावर देखील तोफ डागली. भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह चारजणांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त हा मजकूर लिहीत असताना आले. हे चौघे सतत देशातील सद्यस्थितीवर खुलेपणाने बोलत असतात. कदाचित टीकाही करीत असतात. आता या चारजणांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले हे चारजण सोडून बाकी सगळे ‘साव’ आहेत? आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असे म्हणावे अशीच आहे,” असं भाष्य राऊत यांनी केलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like