राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले गेल्याचे बोलले जात होते. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात दरी वगैरे असे काही नाही. त्यांच्यातील संबंध मधुर आहेत. राज्यपाल हे नेहमी प्रिय आहेत. असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच आजची भेट हि सदिच्छा भेट होती. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. मी बरेच दिवस झाले राज्यपालांना भेटलो नव्हतो म्हणून आज मी त्यांची भेट घेतली असाही राऊत यांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे शुक्रवारी सुचवले होते. यावर कोश्यारी आणि मुख्यमंत्री पुन्हा आमने सामने आले असल्याचे बोलले जात होते. मात्र राज्यपाल हे कुलपती आहेत. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली असं राऊत यांनी म्हटले आहे.