हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि त्यांच्या क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली. क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणात काय संबंध? असे संजय राऊत यांनी म्हंटल.
संजय राऊत म्हणाले की, क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणात काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. मला वाटत नाही क्रांती रेडकर यांच्यावर कोणी व्यक्तीगत टीका केली आहे, मी तरी पाहिले नाही. आम्हाला क्रांती रेडकर यांच्या विषयी प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे. कोणत्याही प्रकारचा तिच्यावर अन्याय होणार नाही असे संजय राऊत यांनी म्हंटल.
दिल्लीतून ज्या प्रकारे आक्रमण सुरु आहे. ज्यांच्या मानगुटीवर कारण नसताना बसण्याचा केंद्रीय तपास यंत्रणेचा प्रयत्न होत आहे, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, देगलूरमध्ये देखील धाडी पडल्या आहेत, मग अशोकराव मराठी नाहीत का?, पवार यांचे नातेवाईक मराठी नाहीत का? सगळेच मराठी आहेत. प्रश्न सत्य-असत्य लढाईचा आहे असेही राऊत म्हणा