ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे हिरेन यांच्या पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; शेलारांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नावही घेतलं जात आहे. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असल्याचं पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत सचिन वाझे –

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment