हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दानवेंवर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायची? चर्चाच करायची असेल तर कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करू. दानेंशी चर्चा करायची गरज नाही, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
रावसाहेब दानवेंनी सांगितलं होत की केव्हाही रेल्वे सुरु करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे आमच्या महाराष्ट्राच्या रेल्वे राज्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. आता शिर्षासन कशाला करताय? हा सर्व जो काही प्रकार चाललेला आहे याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात. काल म्हणाले सुरु करा आणि आज इथे त्यांचे लोक आले आणि रावसाहेबांची भाषा बदलली. रेल्वे काय भाजपाची नोकर आहे का? असा सवाल करत आपण महाराष्ट्र सरकारला सहकार्य केलं पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हंटल