हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्यानंतर वातावरण गरम झालं आहे. दरम्यान या प्रकारानंतर शिवसेना आक्रमक झाली असून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. ही पद्धत बरोबर नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू नये. हा लोकशाही देश आहे. मोदी लोकशाही मार्गानेच सत्तेत आले आहेत. लोकशाहीने येऊन कोणी हुकूमशाही राबवत असेल तरी हा लोकशाही देश आहे, असं सांगतानाच सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा अस आवाहन संजय राऊत यांनी केले. इंडस्ट्रीत आज एकापेक्षा अधिक दिग्गज आहेत. ते गप्प का आहेत? असा सवाल राऊत यांनी केला.
सरकार विरोधात बोललं म्हणून धाड टाकणं गैर आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दिला म्हणून कलाकारांवर धाडी टाकणं, जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला म्हणून धाडी टाकणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोललं म्हणून कलाकारांवर धाडी टाकणं योग्य नाही. अशा मोजक्याच लोकांवर धाडी टाकल्या जात असतील तर लोकांच्या मनात शंका येणारच. असेही राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’