संजय राऊतांनी शेअर केले भाजपाला डिवचणारे व्यंगचित्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणु निकालात शिवसेना-भाजपाच्या महायुतीने मोठे यश मिळवले. असे असले तरी सुद्धा ‘आघाडी’ने सर्वांना जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. महायुतीची अब कि बार २२० पार ची घोषणा हवेत विरली असून, भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर मर्यादित राहावे लागले. त्यामुळे शिवसेनेनंही मुख्यमंत्रिपदासाठी भाजपावर आतापासूनच दबाव टाकण्यास सुरुवात केले आहे.

त्यानंतर आता शिवसेना भाजपावर दबावतंत्राचा वापर करत आहे. काँग्रेसनं शिवसेनेला देऊ केलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाला नामोहरम करण्यासाठी शिवसेना कुरघोडी करत आहे. सोशल मीडियावरही काही व्यंगचित्र व्हायरल होत आहेत. अशाच प्रकारचं एक व्यंगचित्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टाकलं आहे. ”व्यंग चित्रकाराची कमाल …बुरा न मानो दिवाली आहे” असं त्यांनी सोबत लिहिले आहे.  या व्यंगचित्रामध्ये वाघाच्या पंज्यात (हातात) कमळ असल्याचं दाखवण्यात आलं असून, गळ्यात राष्ट्रवादीचं घड्याळ पाहायला मिळतंय. म्हणजेच राष्ट्रवादीच्या मदतीनं भाजपावर कुरघोडी करण्याचा शिवसेनेनं प्रयत्न केला आहे. शिवसेना नेते संजय राऊतांनी हे व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केलं असून, ते वाऱ्यासारखं व्हायरल होत आहे.