संजय राऊतांनी थेट पवारांना सुनावलं; ‘त्या’ मुद्द्यावरून ‘मविआ’त ठिणगी??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात मतभेद पहायला मिळाले. एकीकडे देशभरातील विरोधी पक्षाने ईव्हीएम मशीन विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच दुसरीकडे अजित पवारांनी मात्र आपला ईव्हीएम मशीनवर विश्वास असल्याचे म्हंटल होत, त्यांनतर संजय राऊत यांनी अजित पवारांना चांगलंच सुनावलं आहे . अजित पवार यांची गणना अंधभक्तात होऊ नये असा चिमटा त्यांनी काढला.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आमची दिल्लीत ईव्हीएमच्या घोटाळ्यावर बैठक झाली होती. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास असेल तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. पण अजित पवार यांची गणना अंधभक्तात होऊ नये असं मला वाटतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

ईव्हीएम मशीनवर आपला विश्वास असल्याचे मत काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी व्यक्त केलं आहे. त्यावेळी त्यानी देशातील काही निवडणूक निकालांचे दाखलेही दिले. ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही असं अजित पवारांनी म्हंटल होत. तसेच काही लोक पराभवाचे कारण ईव्हीएमवर ढकलून देत आहेत, असेही त्यांनी म्हंटल्याने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतच एकमत नसल्याचे दिसून आलं.