शिंदेंसोबत 10 आमदारही नव्हते, पण…; रोखठोक मधून राऊतांचा दावा

sanjay raut eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून शिंदे गटासह भाजप आणि निवडणूक आयोगावरच हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंसोबत 10 आमदारही नव्हते, पण अमित शहा व श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले व सुरतला पाठवले असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“तुम्ही सुरतला पोहोचा. निवडणूक आयोग व पुढचे सर्व निकाल शिंदे यांच्याच बाजूने लावले जातील, चिन्ह व शिवसेना शिंद्यांनाच मिळेल.” असे उरलेल्या आमदारांना सांगितले गेले व त्याबाबतचे सूतोवाच फडणवीसांपासून शिंदे गटाच्या आमदारांनी गेल्या काही दिवसात जाहीरपणे केले. कालच्या निकालाने ते सत्य ठरले, उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना राहणार नाही. सर्व काही शिद्यांनाच देऊ, असे आमदार-खासदारांना ठामपणे सांगितले गेले आणि नंतर तसेच घडले .

शिवसेनेत फूट पडली व शिंद यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार पक्ष सोडून गेले. ही विधिमंडळ पक्षातील फूट फार तर होऊ शकते. आमदार व खासदारांनी पक्ष सोडल्याने पक्ष त्यांच्या मालकीचा होत नाही. पण आपल्या विद्वान निवडणूक आयोगाने फुटलेल्या आमदार-खासदारांची मते मोजून निर्णय दिला. मग महाराष्ट्रातील शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, इतर लोकप्रतिनिधी यांना मिळालेली मते का मोजली नाहीत? शिवसेनेनेच या फुटिरांना उमेदवारी दिली व निवडून भागते है। आयोगाच्या लक्षात आले नाही. कारण त्यांना सत्य झाकूनच निर्णय द्यायचा होता व दिल्लीतील सत्ताधान्याचे तसे आदेश होते असं संजय राऊत यांनी म्हंटल.

गृहमंत्री अमित शहा व त्यांचे बॉस नरेंद्र मोदी यांच्या सुडाच्या व बदल्याच्या राजकारणातून शिवसेनेवर इतिहासातील भयंकर हल्ला झाला. अमित शहा यांच्या अहंकारातून हे सर्व घडले. 2019 साली भाजपची साथ सोडून कॉंग्रेस- राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्री पदाबाबत निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द भाजपने पाळला नाही. त्यातूनच महाराष्ट्रात नवे महाभारत घडले. भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या. तरीही शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेली हा जनादेशाचा अपमान असल्याचे शहांपासून फडणवीसांपर्यंत सगळेच बोलतात. पण 2014 साली भाजपने शिवसेनेस दगा दिला. दोघांनी एकमेकांविरुद्ध स्वतंत्र निवडणुका लढवल्या व तरीही सत्तेसाठी है दोन पक्ष एकत्र आले. हा तरी जनादेश कोठे होता? कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर निवडणुकीनंतर भाजपने सत्ता स्थापन केली. हासुद्धा जनादेश नव्हताच. त्यामुळे जनादेशाचा अपमान केला म्हणून शिवसेना फोडली व सत्ता बनवली ही पोपटपंची बरी नाही असं म्हणत शिवसेना एका द्वेषातून व सूडभावनेतून पाडण्यात आली असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.