हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल हे भाजपने नव्याने नेमलेले शिवव्याख्याते आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा जोरदार समाचार घेत भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हंटल आहे. अशा प्रकारचे विधान दुसऱ्या कोणी केलं असत तर भाजपने आत्तापर्यत रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता कि आम्हीच कसे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आहोत पण आता त्यांच्याच राज्यपालांनी असे वक्तव्य केल्याने राज्यातील जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे
राज्यपाल नेमकं काय म्हणाले
औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार ?? चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. तसेच, मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही असा दावाही राज्यपालांनी केला