हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यांवरून पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी आम्हाला कोणाकडेही बोट किंवा हातही दाखवायचा नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तशी वेळ आमच्यावर आणल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून पंतप्रधानांची वेळ मागणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षण विधानसभेत सर्व पक्षांनी एकमताने ठराव मंजूर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र आले पाहिजे. आम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जायला तयार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्यासोबत यावे. असे संजय राऊत यांनी म्हटले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.