हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर येताच विरोधकांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी पहिलाच वार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. संजय राऊत तुरुंगात असताना राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करत राऊतांनी स्वतःशी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हंटल होत, त्याच विधानाचा आधार घेत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
राऊत म्हणाले, मला राज ठाकरेंना सांगायचं आहे की, ईडीने मला केलेली अटक बेकायदेशीर होती हे कोर्टाने सांगितलं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला” असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात तुरुंगात जावं लागतं, मीही गेलो, असं म्हणत त्यांनी टिळक आणि वाजपेयी यांचाही उल्लेख केला.
दरम्यान, माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं. राजकारणात हे होत असत. मी याबाबत कोणाला दोष देणार नाही असं संजय राऊत म्हणाले. मी येत्या काही दिवसात मी शरद पवारांना भेटणार आहे. मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही भेटणार आहे आणि माझ्याबाबत काय झालं हे त्यांना सांगणार आहे. मी देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे कारण हे राज्य फडणवीसच चालवत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.