मनसेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपाने हिंदुत्वाचा गळा घोटला – संजय राऊत

0
88
Raut thackeray fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भोंग्याच्या विषयावरून राजकारण ढवळून निघालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून आक्रमकी भूमिका घेतल्यांनंतर आज अनेक ठिकाणी अजान झालं नाही तर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरावर काकड आरती होऊ शकली नाही याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला. मनसेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपाने हिंदुत्वाचा गळा घोटला असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.

भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्रेंबकेश्वर सह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्या मुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मशिदींवरील भोंग्यांचं निमित्त करून भाजपाने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदूंचाही गळा घोटला हे आज स्पष्ट झालं. त्यामुळे आजचा दिवस हिंदूंसाठी ‘काळा दिवस’ आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.

भोंग्याचा विषय हा सामाजिक नाही तर धार्मिकच वाद आहे. हा हिंदुमध्ये फूट पाडण्याचा वाद आहे. यामागे भाजपचच कारस्थान आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला आहे. भाजपने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा वापर करुन घेतला. जी गोष्ट भाजपला जमत नाही ती गोष्ट लहान पक्षांना हाताशी धरुन करत असते, असे संजय राऊत यांनी म्हंटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here