बेळगावच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार ; संजय राऊतांचा मोदी – शहांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

हा भाषा वाद आहे. तो फार वाढू नये. आम्ही राष्ट्रीय एकात्मता मानतो. कर्नाटकनेही राष्ट्रीय एकात्मता मानली पाहिजे. बेळगावात कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू आहे. कन्नड वेदिका संघटनेच्या फडतूस लोकांनी वातावरण बिघडवले आहे. ही भाजप स्पॉन्सर संघटना असून बेळगावातील परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बेळगावात खुनी हल्ला सुरू आहे. आमच्या लोकांवर हल्ला होता आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही शांत आहेत. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हल्ल्याची भाजपला चिंता वाटते. मग कर्नाटकमधील हल्लांबाबत मोदी आणि शहा गप्प का? असा सवालही त्यांनी केला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment