विरोधी पक्ष उघडा पडला; नवनीत राणांच्या ‘त्या’ व्हिडिओ नंतर राऊतांची फटकेबाजी

0
74
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिसांनी आपल्याला हीन दर्जाची वागणूक देत साधं पाणीही पिऊन दिले नाही असा आरोप अमरावती खासदार नवनीत राणा यांनी केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी थेट राणांचा पोलीस स्टेशन मधील चहा पितानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्या आरोपातील हवाच काढली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत विरोधी पक्ष राणा प्रकरणात उघडा पडला अशी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल की, गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. मात्र संजय पांडे यांनी पोलिसांवर लावलेले आरोप कसे बिनबुडाचे आणि खोटे आहेत, हे पुराव्यासह दाखवून दिलं आहे. आरोपी राणा दांपत्यासाठी पोलिस कसे सौजन्याने वागतात हे संजय पांडे यांनी दाखवलेल्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाने संजय पांडे यांचे आभार मानले पाहिजे अस राऊत यांनी म्हंटल.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1003595246991369/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर देखील निशाणा साधला. राणा प्रकरणामध्ये विरोधी पक्ष उघडा पडला. विरोधी पक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अतिशय जबाबदारीने आरोप केला पाहिजे. परंतु दुर्दैवाने या सगळ्या चिखलफेकीत विरोधी पक्षनेते देखील सामील झालेले आहेत आणि स्वतःवर चिखल उडवून घेत आहेत असा टोला राऊतांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here