देशाला खरा धोका हा नकली हिंदुत्वावाद्यांकडूनच – संजय राऊत

मुंबई : देशाला खरा धोका हा नकली हिंदुत्ववाद्यांकडूनच आहे असे मत शिवसेना खासदार संजर राऊत यांनी व्यक्त केले आहे. अमरावती हिंसाचार प्रकरणावर बोलताना राऊत यांनी सदर प्रतिक्रिया दिली. मुंबई येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी, तुम्ही उद्धवजींचे दसरा मेळाव्यातील भाषण ऐकले असेल. देशाला खरा धोका हा नकली हिंदुत्ववाद्यांकडून आहे असं ते म्हणाले होते. निवडणुक येते तेव्हा हे लोक हिंदू मुस्लिम वाद मोठा करता..हिंदुस्तान पाकिस्तान भांडणे काढतात. कुठे तरी दंगे व्हावेत असं त्यांना वाटतं. अन् ते अशा गोष्टींचा फायदा घेऊन निवडणुकीत मत मागतात असा आरोप राऊत यांनी केला आहे.

यावेळी कंगणा राणावतच्या वादग्रस्त विधानावर प्रश्न विचारला असता राऊत यांनी महात्मा गांधी हे जगाचे नायक होते. त्यांची विचारधारा सर्व जगाने आपलीशी केली आहे. आज या देशाचे पंतप्रधान मोदीही गांधीजींच्या जयंतीला त्यांच्या समाधीला पुष्पहार अर्पन करायला जातात. आज देशाची स्थिती काय आहे? चीन अरुनाचलमध्ये घुसखोरी करतोय, कश्मिरी पंडितांची हत्या होतेय हे या मॅडमना माहिती नाही असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंची आज पुण्यतिथी आहे. बाळासाहेब हे एक योद्धा होते. त्यांनी देशाला राष्ट्रभक्ती शिकवली. हिंदू अब मार नही खायेगा हे वाक्य बाळासाहेबांनी देशाला दिलं. तसेच मराठी माणसाकरता त्यांनी खूप काम केले असे म्हणत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले.

हे पण वाचा :

काळजाचा ठोका चुकवणारा Video; जोडप्याचा पॅराशूट रायडिंग करताना अचानक तुटला दोरखंड

नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

Ration Card : आता घरबसल्या एका क्लिकवर बनणार रेशनकार्ड, कसे ते जाणून घ्या

Bank Holidays – ‘या’ शहरांमध्ये पुढील 5 दिवस बँका बंद राहणार, सुट्ट्यांची लिस्ट पाहून करा महत्वाची कामे

अब हिंदू मार नही खायेगा या चंद्रकांतदादांच्या विधानाच्या भरवशावरच सगळे लढले; अनिल बोंडेंची कबूली

You might also like