जरांगे पाटलांनी शिंदे- फडणवीस- पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही,” असा दम मनोज जरांगे-पाटलांनी भरला. जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले. व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही. मनोज जरांगे पाटलांनी शिंद फडणवीस पवार या दुतोंडी सरकारच्या ढोगाचा बुरखा फाडला आहे असं म्हणत ठाकरे गटाने सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले व शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर शिंदे फडणवीस पवारांच्या सरकारने अमानुष लाठीमार केला, बंदुका चालवल्या, शिंद- फडणवीस अजित पवार सोडून सगळेच नेते जरांगे-पाटलांच्या गावात जाऊन आले. सारवासारवी म्हणून सरकारने आता जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा बळी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले. त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का? नागपूरच्या चाणक्यांचे जामनेरी चाणक्य गिरीश महाजन है मनोज जरांगे-पाटलांना भेटायला गेले. मराठा आरक्षणासाठी सरकार काय काय करते आहे ते त्यांनी सांगितले, पण जरांगे- पाटील यांनी खिशातून बंदुकीची गोळी काढून महाजनांच्या हाती दिली व सांगितले, “तुमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी हे केले. आम्ही आरक्षण मागितले. सरकारने बंदुकीची गोळी दिली.” तसेच “मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही,” असा दम जरांगे-पाटलांनी भरला. जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले. व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही.

भाजपने फडणवीसासारख्या लोकाना पक्षात ठेवू नये, अन्यथा ते मराठयांना गोळ्या घालतील, असा संताप जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्या संतापाची घम आज महाराष्ट्र भोगतो आहे. मुख्यमंत्री शिंद म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे, तर गृहमंत्री फडणवीस तिसऱ्या दिवशी माफी मागण्याची मखलाशी करतात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकावर गोळ्या चालवण्याचे अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा. तर तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठया गोळया चालवायचे आदेश द्यायचे व दुसन्या तोंडाने मला तुमच्या वेदनाची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या नोज जरांगे पाटलांनी शिंद फडणवीस पवार या दुतोंडी सरकारच्या ढोगाचा बुरखा फाडला आहे.