हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. आज महाविकास आघाडीने सरकारविरोधात मुंबईत विराट असा महामोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत संजय राऊत बोलत होते.
या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणार्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही म्हणून हा मोर्चा म्हणजे सरकार उलथून टाकण्याचा इशारा आहे. आज महाराष्ट्र जागा झाला आहे, महाराष्ट्र पेटला आहे. आणि महाराष्ट्राची शक्ती आणि ताकद काय आहे हे आज दिल्ली सुद्धा बघत असेल. छत्रपतींचा अपमान करणारे मंत्रालयात बसले हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा अपमान आहे असे संजय राऊत म्हणाले.
https://www.facebook.com/AjitPawarSpeaks/videos/738553017936846/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB&ref=sharing
यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून देखील आपला संताप व्यक्त केला. तो कर्नाटकाचा मुख्यमंत्री बोम्मई रोज महाराष्ट्राची बदनामी करत आहे. तुम्हाला जमत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या. एकीकडे चीनशी लढण्याची भाषा आणि इकडे महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठी बांधवांवर अन्याय करतायत.पण महाराष्ट्र अखंड आहे, एकत्र आहे हे सांगणारा हा मोर्चा आहे असं राऊत म्हणाले.