संजय राऊतांची नाव न घेता दोन्ही राजेंवर टीका; म्हणाले की, छत्रपतींच्या वंशजानी….

sanjay raut in satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
छत्रपतींच्या वंशजांनी भारतीय जनता पक्षाशी केलेली तडजोड महाराष्ट्राच्या इतिहासाला मान्य होणार नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी साताऱ्यातील (Satara) दोन्ही राजेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. सातारा येथील शिवगर्जना संवाद यात्रेच्या माध्यमातून एका जाहीर सभेत संजय राऊतांनी ही टीका केली आहे.

तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजिबात आदर आणि प्रेम नाही. पूर्वी छत्रपती पेशवांच्या नेमणूका करत होते. पण आता पंत नेमणुका करायला लागले आहेत हे महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमान्यांची गादी आहे. इथल्या प्रतापसिंह महाराजांनी स्वाभिमानासाठी इंग्रजांविरोधात त्याग केला मात्र त्यांच्या वंशजांनी भाजपा सोबत तडजोड केली ही इतिहासाला मान्य होणार नाही अशी टिका संजय राऊत यांनी दोन्ही राजेंवर केली आहे.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयानं निवडणुक आयोगच बेकायदेशीर आहे असं म्हटल आहे त्यामुळं आता निवडणुक आयोग कसा असावा या करिता ३ लोकांची कमिटी नेमली आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी साता-केलय. हा चुना आयोग आहेस आणि २०२४ मध्ये ज्यांनी निर्णय दिला त्या चुना आयोगाला नाही चुना मळत बसायला‌ लावलं तर बघा अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.