दिल्लीत आम्ही सर्वजण एक, आमची फाळणी होणार नाही; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपकडून शिवसेनेत नाराज खासदार व आमदार असल्याबाबत विधान केले जात असल्याने त्यावरूनही भाजपवर निशाणा साधला. यावेळी राऊत यांनी नवी दिल्ली शिवसेना खासदारांच्या बैठकीत खासदारांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबतही सांगितले. यसेच दिल्लीत इतर पक्षातील नेते एकत्रित असून महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कधीच फाळणी होणार नाही, असे राऊत यांनी म्हंटले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीत असलेल्या नेत्यांनी एकत्रित बसून संवाद साधने आवश्यक आहे. त्यासाठी दिल्लीतल्या नेत्यांनी संवाद साधावा. सामान्य पदाधिकाऱ्याला आपला पक्ष वाटला पाहिजे. म्हणीन सर्वांनी एकत्रित आले पाहिजे.

महाराष्ट्रात सरकार तीन पक्षाचं आहे. खाली दोन पक्ष आहे. त्यांना नाराज करून चालणार नाही. मंत्री मंडळाचा विस्तार करायचा निर्णय मुख्यमंत्री निर्णय घेतील. कॉंग्रेसचे आमदार दिल्लीत आले आहेत. काल माझी आणि वेणु गोपालराव यांची भेट झाली. दोघांच्यामध्ये अनेक विषयावर चर्चाही झाली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पक्षांच्या कामाला जोरदार सुरूवात केली आहे. राज्यपालांशी संघर्ष करायला आम्ही काही तयार नाही मात्र, संघर्ष करण्याची त्यांना खाज आहे. ती खाजवायची सवय त्यांना लागली आहे. एवढी खाज बरी नाही.

देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी अध्यापही भोंगे उतरले नाही. काळ गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. गोव्यात दहा वर्षे झाली भाजप आहे. आताही भाजपची सत्ता आली आहे. गोव्यात भोंगे आहेत. त्या ठिकाणी कधी उतरणार? उत्तर प्रदेशातही भोंगे आहे. तेथे काय केले जाणार हे पाहूया, असे राऊत यांनी सांगितले.

तर तुमच्यामागेही ईडी लागेल – राऊत

ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी आज भाजपवरही टीका केली. यावेळी राऊत म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सगळं कळते कि ईडी कुणाकुणाच्या मागे लागते. त्यामुळे भाजोनि, चिकन खरेदी करताना सर्वजणांनी पैसे जपून वापरावेत. त्यांना कळलं तर, ते त्यांच्यामागे सुध्दा ईडी लावतील. प्रत्येक गोष्टीवर भाजपचं लक्ष आहे, त्यामुळे सावध राहिलं पाहिजे, असे राऊत यांनी म्हंटले.