मुंबई प्रतिनिधी । गेला महिनाभर चालू असलेल्या राजकीय नाट्यावर काल अखेर पडदा पडला. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर भाजपा सरकार कोसळले. याचा परिणाम म्हणून बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि राज्यामध्ये ‘महाविकासआघाडी’ चे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले. आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. या सर्व घडामोडींवर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं असून एक शेर पोस्ट केला आहे.
”अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है , अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है’ असा शेर त्यांनी पोस्ट केला आहे. दरम्यान भाजपासोबत मुख्यमंत्रीपदावरुन झालेल्या वादानंतर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडण्यात शिवसेनेकडून संजय राऊत यांची मोठी भूमिका आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांनी योग्य रितीने पार पाडली. महाविकासआघाडीचं सरकार राज्यात स्थापन होण्यामध्ये शिवसेनेच्या बाजूने संजय राऊत यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आज देखील ट्विट करत त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे.
अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है
अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है
अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को
अभी तो पूरा आसमान बाकी है— Sanjay Raut (@rautsanjay61) November 27, 2019