बाळासाहेबांसोबतचा ‘तो’ फोटो ट्विट करत गुरुपौर्णिमेनिमित्त संजय राऊतांनी केलं अभिवादन; म्हणाले कि…

Sanjay Raut Balasaheb Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक ट्विट करत “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच”, असे म्हंटले आहे. त्यांच्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आपल्या गुरूला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. त्यांनी एक फोटो शेअर करत “वो ही ‘गुरू’… ‘गुरूर’ भी वो ही ! जय महाराष्ट्र !!,” असे म्हंटले आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी आपल्या अभिवादनपर ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटो शेअऱ केला आहे. त्यांच्या ट्विटमध्ये गुरु आणि गुरुर या दोन महत्वाच्या शब्दांच्या उल्लेख करण्यात आला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना गुरुस्थानी मानत अभिवादनपर ट्विट केले आहे.

 

एकनाथ शिंदेंचं नेमकं ट्विट काय?

आज गुरुपौर्णिमा असल्याने सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपल्या गुरूंना आभिवादन केले आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही,” असे म्हणत त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादनपर ट्विट केले आहे.