मुंबई प्रतिनिधी। आरेतील वृक्षतोडी विरोधातील पर्यावरणवादींची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. आरेमध्ये मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात येत होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास चारशे हुन अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकाणावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक व्यंगचित्र शेयर करत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधताना दिसत आहेत. तसेच या पट्टीवर ‘आरे हे जंगल नाही’ असे लहिलेले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2019
आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल लागताच संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे कापायला सुरुवातही झाली. रात्रीच्या अंधारात झाडं कपण्याचा हा प्रकार फार काळ लपू शकला नाही. पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याचा सुगावा लागला. आणि शेकडोंच्या संख्येने त्यांनी आरेत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. तर आज आरे परिसरात प्रशासनाने खबरदारी म्हणून जमावबंदी लागू केली