आमच्या झमेल्यात पडू नका, नाहीतर उरली सुरली प्रतिष्ठा गमावाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून भाजपकडून याच पार्श्वभूमीवर हालचाली वाढत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. या झमेल्यात फडणवीसांनी पडू नये, आमचं आम्ही बघू अस राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, फडणवीसांना आम्ही सल्ला देतो की तुम्ही या फंदात पडू नका. जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल. त्यामुळे या झमेल्यात त्यांनी पडू नये नाहीतर भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये पडू नका.

दरम्यान, बंडखोर आमदारांचा कुटुंबाची सुरक्षा राज्य सरकारने काढल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? स्वत:ला वाघ म्हणवता मग बकरीसारखे का पळता? असा टोला राऊतांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.