हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल 2 तास चर्चा केल्यानंतर लगेचच सिल्वर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत.
मी सहज पवारांना भेटलो. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच सरकार पूर्णपणे 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करेल आणि उद्धव ठाकरे उत्तम काम करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चाललं आहे अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिल्लीत मोदींची भेट घेतली होती. यानंतर ठाकरे सरकार मध्ये भेटीगाठी वाढल्या होत्या. दरम्यान या सर्व बैठकांचा संदर्भ या राजकीय हालचालींमागे असल्याचं सांगितलं जात आहे.