हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. तसेच या पत्रातून “विरोधकांचा छळ करण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी मदत करावी, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती राऊतांनी नायडूंना दिली आहे.
संजय राऊत नायडू यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझी भेट घेत राज्यातील सरकार पाडण्यासाठी मदत मागितली होती. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील यासाठी मदत करावी असा त्यांचा हेतू होता. मी नकार दिला अता मला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकी देण्यात आली. जेलमध्ये राहावे लागलेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांप्रमाणे मलाही परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले.
सत्यमेव जयते.. pic.twitter.com/ImdX7wPuYa
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2022
यावेळी त्या लोकांनी माझ्यासोबत कॅबिनेटमधील इतर दोन वरिष्ठ मंत्री आणि याशिवाय इतर दोन मंत्र्यांनाही पीएमएलए अंतर्गत जेलमध्ये टाकणार आहोत अशी धमकी दिली. महत्वाचे नेते जेलमध्ये गेल्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे त्यांचे म्हणणे होते,” असे राऊत यांनी नायडूंना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे.