जेलमधून सुटल्यावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

0
301
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. यांनतर आज ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली. राऊत यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आपली सुटका झाल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

संजय राऊत म्हणाले, सुटका झाल्याचा आनंद आहे. माझी अटक कोर्टानेच बेकायदेशीर ठरवली . न्यायालवरील विश्वास वाढला. आम्ही जे निरीक्षण सांगत होतो तेच कोर्टाने सांगितलं. माझी तब्ब्येत आत्ता ठीक नाही, पण मला बर वाटल्यानंतर नक्की याविषयी माध्यमांशी सविस्तर बोलेन असं संजय राऊत यांनी म्हंटल. आम्ही लढणारे आहोत असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. शिवसेनेवर या ३ महिन्यात खूप प्रहार झाले पण शिवसेना खचली नाही. आमचा आत्मा बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या स्मृतिस्थळावर जाणार आहे असं राऊतांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. त्यांना अतिशय आनंद झाला असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी गळ्यातील भगवं उपरणं फडकावून आणि हात जोडून अभिवादन केलं. आर्थर रोड तुरुंग परिसरात संजय राऊत यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. संजय राऊत हे शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या सुटकेमुळे शिवसैनिकांच्या अंगात नवा जोश आणि ऊर्जा संचारल्याचे पाहायला मिळत आहे. राऊत जेलबाहेर आल्यामुळे उद्धव ठाकरेंनाही मोठा दिलासा मिळाला आहे.