हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या भूमिकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही संघर्ष करू शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. फार फार सत्ता जाईल, मात्र, प्रतिष्ठा सर्वात मोठी असते, असे राऊत यांनी म्हंटले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पत्याच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल असे भाजपला वाटत असेल पण शिवसेनेत सखेतून गरूडझेप घेण्याची ताकद आहे. शिवसेना पाठिमागून वार करत नाही. समोरून शिवसेना निर्णय घेते त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचीच फूस असल्याच्या आरोपात तथ्य नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आम्ही सरकारमध्ये आहोत. पक्षाकडूनही शिंदे यांच्याशी संवाद सुरू आहे. शिंदे हे शिवसैनिक आहेत. पक्ष सोडणं शिदेना सोप नाही आम्हालाही त्यांना सोडणे सोप्प नाही. एकतास मी त्यांच्याशी बोललो. परत त्यांच्याशी चर्चा होईल. सर्व शिवसेनेत परत येतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.